Thursday, 7 February 2013

गजानन बावन्नी





!==~==>>>> गजानन बावन्नी <<<<==~===!!
************************************
जय जय सदगुरू गजानना | रक्षण तूची भक्तजना ||||
निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||||
सदेह तू परी विदेह तू | देह असुनी देहातीत तू ||||
माघ वाघ सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||||
उष्ट्या पत्रावळी निमित्त्य | विदेहत्व तव हो प्रगट ||||
बंकात्लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||||
गोसाव्याच्या नावासासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||||
तव पदतीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला||||
जानिकीरामा चिंचवने | नसवूनी स्वरूपी आणणे ||||
मुकीन चंदू कानवले | खुनी कृत्यार्थ त्या केले||१०||
विहिरीमाजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११||
मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२||
त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखवले ||१३||
कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४||
वेद म्हणुनी दाखविला चकित द्रविड ब्राम्हण झाला ||१५||
जळत्या पर्यकावरती | ब्रम्हगिरी ला ये प्रचीती ||१६||
टाकली कर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७||
बाळकृष्ण बाळापूरचा | समर्थ भाक्त्ची जो होता||१८||
रामदास रूपे त्याला | दर्शन देवूनी तोषविला ||१९||
सुक्लालाची गोमाता | द्वाड होती ती ताता ||२०||
कृपा तुझी होताच क्षणी | शांत झाली ती जननी||२१||
पुढे लक्षमण शेगावी | येत व्याधी तू निवरी ||२२||
दांभिकता परी ती त्याची | तू चाळवूनी घे साची ||२३||
बस्कर पाटील तव भक्त | उद्धारालासी तू त्वरित ||२४||
आघ्या तव शीरसावंघ | काकही मानती तुज वंघ ||२५||
विहिरी माजी रक्षियला | देवा तू गानू जाव्रयाला ||२६||
पितांबरी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७||
सुबुद्धी देशी जोश्या ला | माफ करी तो दंड ला ||२८||
सावडत येथील गंगा भारती | थुंकूनी वरिली रक्तपित्ती ||२९||
पुंडलिका चे गंडांतर | निष्टा जानुनी केले दूर ||३०||
ओमकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१||
माधवनाथ समवेत | केले भोजन अद्रुश्य ||३२||
लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूंची पाठविला ||३३||
कवर सुतांची कांदा भाकर | भाक्शियाली त्या प्रेम खातर ||३४||
नग्न बैसुनी गाडीत | लीला दाखविली विपरीत ||३५||
बायाजे चित्ती तव भक्ती | पुंडलिका वर वीरक्त प्रीती ||३६||
बापूंना मनी विठ्ठल भक्ती | स्वये होशील तू विठ्ठल मूर्ती ||३७||
काव्ठ्याच्या त्या वारकर्याला | मारी पासून वाचविला ||३८||
वासुदेव याती तुज भेटे | प्रेमाची ती खून पटे ||३९||
उद्धट झाला हवालदार | भस्मी भूत झाले घर दार ||४०||
देहांत च्या नंतर हि | किती जन अनुभव येई ||४१||
पडत्या मजूर झेलीयाले | बघती जन आश्चर्य भले ||४२||
अंग वरती खांब पडे | स्त्री वाचे आश्चर्य घडे ||४३||
गजानना च्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४||
शरण जाउनी गजानना | दु: तयाते करी कथना ||४५||
कृपा करी तो भक्त सी | धाउनी येतो वेगासी ||४६||
गजानना ची बावन्नी| नित्य असावी ध्यानी मनी ||४७||
बावन्न गुरुवारी नेमे | करा पाठ बहु भक्ती ने ||४८||
विघ्ने सारी पळती उर | सर्व सुखांचा येईल पूर ||४९||
चिंता सार्या उर करी | संकटातुनी पार करी ||५०||
सदा चार रात सदभक्त्ता | फळ लाभे बघता बघता ||५१||
जय बोला हो जय बोला| गजानना ची जय बोला ||५२||
जय बोला हो जय बोला | गजानना ची जय बोला ||

!!!श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज कि जय ....!!!

No comments:

Post a Comment